नंदुरबार l
शहरातील मराठा गल्ली येथे झालेल्या वादातून तिघांना लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने मारहाण करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील गणेश मराठे व त्यांची पत्नी माधुरी मराठे तसेच प्रविण मराठे यांच्या वाद झाला. सदर वादातून गणेश मराठे, रमेश मराठे व त्यांचे वडील महादू मराठे यांना प्रविण मराठे, दीपक मराठे व महेश मराठे यांनी लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने मारहाण करुन गंभीर दुकापत केली.
तसेच रमेश मराठे यांच्या बोटातील अंगठी व गळ्यातील लॉकेट काढून घेतले. याबाबत रमेश मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२६, ३९४, ५०४, ३४ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.