नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळ असलेल्या हॉटेजजवळ ट्रॅव्हलबस मधून व्यापार्याचे दोन लाख रूपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर शहरातील बुरूड गल्लीत राहणारे व्यापारी अक्षय घोरपडे हे बांबूच्या टोपल्यांची खरेदी करण्यासाठी रविकृष्ण ट्रॅव्हल्स (क्र.ए.आर.०१-आर. ०८८७) हिच्याने जात असतांना सदर लक्झरी बस ही नवापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रायंगण शिवारातील हॉटेल ओमसाई समोरील पटांगणात थांबली असता अक्षय घोरपडे हे लघवी करण्यासाठी खाली उतरून गेले असता या कालावधीत कोणत्यातरी दोन अज्ञात इसमांनी लक्झरी बसमध्ये जावून त्यांच्या बॅगेची चैन उघडून बॅगेत असलेल्या पिवळया पिशवी ठेवलेले दोन लाख रूपये चोरून घेवून पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनात पळून गेले.
म्हणून अक्षय सुधाकर घोरपडे रा.बुरूडगल्ली अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि निलेश वाघ करीत आहेत.








