नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा रस्त्यावर दुचाकीस्वारास रेतीच्या डंपरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबा व नात जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेलया माहितीनुसार, तळोदा रस्त्यावरील कल्याणी रेसिडेन्सीसमोरील रस्त्यावर कल्याणी रेसीडेन्सी येथे राहणारे मणिलाल चौधरी हे त्यांच्या नात सोबत हेल्मेट घालून ईलेक्ट्रीक मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-ए.के.७२८८) हे या वाहनाने नंदुरबारहून तळोदा रस्त्याने कल्याणी रेसीडेन्सीला येत असतांना त्यांच्या पाठीमागून येणारा डंपर (क्र.एम.एच.१५-एच.एक्स.७६१३)हिच्यावरील ट्रक चालकाने भरधाव वेगात येवून मोटरसायकलला जोराची ठोस दिली. त्यावेळी अपघातात मणिलाल चौधरी व नात ग्रीष्मा असे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. मणिलाल यांना डोक्यावर व पायाला गंभीर दुखापत झाली व ग्रीष्मा हिचा उजव्या पायाला गंभीर दुखापत होवनू उजव्या पायाची तीन बोटे कापली गेली. अपघात झाल्यानंतर डंपर चालक तेथून फरार झाला.
मणिलाल व ग्रीष्मा यांचा गंभीर दुखापती व मोटरसायकलीच्या नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून नरेंद्र मणिलाल चौधरी रा.कल्याणी रेसीडेन्सी राकसवाडे शिवार (ता.जि.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटरवाहन कायदा कलम १९४, १३४/ १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ कैलास मोरे करीत आहेत.








