Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पळाशी फाटयाजवळ कापसाला भाव कमी मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांचे रास्तारोको, साडे सात हजार भाव मिळाल्याने आंदोलन मागे

team by team
December 26, 2022
in राज्य
0
पळाशी फाटयाजवळ कापसाला भाव कमी मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांचे रास्तारोको,  साडे सात हजार भाव मिळाल्याने आंदोलन मागे

नंदुरबार| प्रतिनिधी

कापसाला भाव कमी मिळाल्याने सुमारे १०० ते १५० शेतकर्‍यांनी आज नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाटयाजवळ रास्तारोको आंदोलन केले. यावेळी ७ हजार ५०० च्या वर भाव देण्यात आल्याने दुपारून २ वाजेनंतर कापसाचा लिलाव सुरू झाला. यावेळी मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झालेली दिसली.

नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीची सुरूवात करण्यात आली आहे. शुक्रवारी याठिकाणी कापसाला प्रति क्विंटल ८ हजार ४०० रूपये दर मिळाला होता. आज पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात सुमारे १०० ते १५० वाहनातून शेतकरी कापूस विक्रीसाठी दाखल झाले होते. यावेळी कापसाला ७ हजार २०० रूपये भाव प्रतिक्विंटल मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी नंदुरबार निझर रस्त्यावरील पळाशी फाटयावर रास्तारोको आंदोलन केले. दोन दिवसापुर्वी ८ हजार ४०० भाव असतांना दोन दिवसातच हजार ते १२०० रूपयांचा दर कमी झाल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या.

शासनाने ८ हजाराच्यावर दर निश्‍चित केलेला असतांना कापूस इतक्या कमी किंमतीत का खरेदी करण्यात येत असल्याचा सवाल केला. यावेळी कापूस खरेदी केंद्राचे अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कापसाचा भाव आम्ही ठरवत नसतो, वरील कार्यालयातून आम्हाला ज्या दिवशी जो भावाचा आदेश येतो. त्या भावाने आम्ही कापूस खरेदी करीत असतो. चर्चेनंतरही शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. शेतकर्‍यांचे आंदोलन सुमारे दिड तासाचावर सुरू होते. यावेळी पोलीसांनी चर्चा करीत असतांना वाहनांना जाण्यासाठी जागा करून दिली.

यावेळी दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. जोपर्यंत कापसाला समाधानकारक भाव मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल. असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. यावेळी ७ हजार ५०० च्या वर भाव देण्यात आल्याने दुपारून २ वाजेनंतर कापसाचा लिलाव सुरू झाला. दुपारून २ वाजेनंतर कापसाचा लिलाव सुरू झाला.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भरत गावीत यांच्या पॅनलने आमदारासह उमेदवारांना दाखवले आस्मान

Next Post

सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी विकासकामे करून गावे आदर्श करावी : जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Next Post
सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी विकासकामे करून गावे आदर्श करावी : जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया  गावित

सर्व नवनिर्वाचित सरपंचांनी विकासकामे करून गावे आदर्श करावी : जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add