नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीचा उंबीलापाडा येथील फरशी पुलाजवळ दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीचा वहिफळीपाडा येथील कृष्णा प्रतापसिंग वळवी हा त्याच्या दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एए ४१८९) कमलबाई समेरसिंग वळवी यांना बसवून घेऊन जात होता.
यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने भगदरीचा उंबीलापाडा येथील पुलाजवळ कमलबाई वळवी यांचा तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भावनाबाई गोविंद पाडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात कृष्णा वळवी याच्याविरोधात भादंवि कल्म ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३०/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक बुनकर करीत आहेत.








