तळोदा l प्रतिनिधी
अभिनेता शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालावा असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो
. ‘पठाण’ चित्रपट ज्या ज्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल, ते चित्रपटगृह बंदी घलण्यात यावी. या बाबत तहसीलदार साहेब यांना संदर्भात निवेदन तळोदा धर्मरक्षकच्या वतीने देण्यात आले
यावेळी तळोदा धर्मरक्षक समितीचे अमन जोहरी ,किरण ठकारे ,रोहित सुर्यवंशी ,चिंटू जोहरी,किशोर कुंभार आकाश भोई, मयुर साठे,मयुर ढोले,गोलू भोई,नितीन कुंभार,मयुर सोनवणे, नीरज भोई,तुषार जोहरी ,विक्की भोई, कल्पेश जोहरी , गणेश जोहरी सचिन भोई आदी उपस्थित होते.








