तळोदा l प्रतिनिधी
तळोदा हद्दीलगत उंटावद (गूजराथ) तळोदा कुटीर रुग्णालय परिसरातील शेतशिवार गावामध्ये गेल्या दहा दिवसां पासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्या सोमवारी सकाळी गुजरात वनविभागाने जेरबंद केले. सदर बिबट्या पाहण्यासाठी तळोदा शहरातील व उंटावद परिसरातील गावकऱ्यांनी मोठी प्रमाणावर गर्दी केली होती. सदर बिबट्याने गावकऱ्यांचा अनेक वासरु, शेळ्या, कोंबड्यांना फस्त केल्याचा घटना घडत होत्या. सदर गुजरात वनविभागाने पिंजरा लावल्याने हा बिबट्या जेरबंद झाला गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गुजरात सामाजिक वनीकरण विभागाच्या माहितीनुसार तळोदा शहरा नजीक असलेल्या उंटावद शिवारात तीन वर्षीय नर असलेल्या बिबट्याने गेल्या आठ, दहा दिवसांपासून मोठी दहशत निर्माण केली होती. तर एवढ्यावर न थांबता तर तो रात्री उंटावद गावात येवून गावकऱ्यांचा घराचा छतावर रात्रीच्या सुमारास येवून बसत होता. सदर या बिबट्याने काही शेतकरी, आणि गावकऱ्यांचा शेळ्या व कोंबड्या फस्त केल्याचे गावकरी सांगतात सदर या बिबट्याचा दहशतीने उंटावद परिसरातील शेतकरी व शेतमजूर हवालदिल झाले होते. सदर शेत शिवारात संध्या उसाची सुरू असलेल्या तोडीही बंद झाल्या होत्या.
परिणामी शेतकरी देखील संतप्त झाले होते. यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी तेथे पिंजरा लावण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी व शेतकरी, शेतमजूर यांनी केली होती. त्याची दखल घेत उच्छल येथील सामाजिक वनीकरण विभागाने उंटावद गावानजीकच्या शेतात दोन तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. त्यात दोन किलो माशांचे सुके बोमील ठेवले होते. बोंबिलचा उग्र वासाने बिबट्या ते खाण्यासाठी रविवारी रात्री पिंजऱ्या जवळ आला व पिंजऱ्यात अडकला. ही बाब सोमवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्या नंतर त्याला बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले .
त्याने ही बातमी गावकऱ्यांना सांगितल्या नंतर गावकऱ्यांनी उच्छल सामाजिक वनीकरनास कळवली. या विभागाचे वन क्षेत्रपाल नेहा चौधरी, एन. आय. चौधरी, एस. एम. गाची व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. दहशत पसरविनारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची वार्ता कर्नोप कर्णी गावकऱ्यांना पोहचल्या नंतर तळोदा शहर व उंटावद परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.कुकरमुंदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी मेघा मॅडम यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली होती. सदर बिबट्या तीन वर्षाचा हा नर बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. त्यास वनविभागाचे उच्छल कार्यालयात नेण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कुकरमूंडा तालुक्यातील उंटावद गावानजीक लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात रविवारी रात्री बिबट्या जेरबंद झाला आहे.त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सुदृढ आहे. त्यास वरिष्ठांचा मार्गदर्शन नुसार उच्छल येथे वन विभागाचे कार्यालयात नेण्यात आले आहे.








