म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने शालेय विभागस्तरीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत वेगवेगळे वयोगट 14, 17 ,19 या वयोगटात स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी शालेय विभागस्तरीय पातळीवर चावरा स्कूलची विद्यार्थीनींने 17 वर्षे वयोगटात ,*प्रांजल दिनेश बैसाणे*प्रथम क्रमांकाने स्पर्धेत यश मिळवले तिची राज्यस्तरीय पातळीवर निवड करण्यात आली. शालेय स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनीला चावरा स्कूल चे क्रीडाशिक्षक डॉ,दिनेश बैसाणे व मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का उपमुख्याध्यापक फादर सीजीन व राष्ट्रीय पंच डॉ राजेश जाधव नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले.








