म्हसावद l प्रतिनिधी
शहादा म्हसावद येथील ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान सुरू असताना वाॅर्ड क्रमांक 2 मध्ये राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला.
वाॅर्ड क्रमांक 2 मधील रहिवासी पंकज रविकांत महिंद्रे याचे लग्न होते.लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या अगोदर राष्ट्रीय कर्तव्यपुर्ती म्हणून पंकजने मतदानाचा हक्क बजावला.मतदान केंद्रात चक्क नवरदेव आल्याने सर्वांनी कौतूक केले.








