अक्कलकुवा l प्रतिनिधी
अखेर अक्कलकुवा ग्रामपंचायत प्रशासनाची झोप उघड़ली असून मतदान केन्द्र असल्यामुळे गटारीची साफसफाई सह रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्ये काम सुरु करण्यात आले आहे.
अक्कलकुवा शहरातील मागील अनेक वर्षा पासून वार्ड क्र. ४ मधील न्यू इंग्लिश स्कूल च्या मागील मुख्य रस्त्यावर गटारिच्या घाण पाणी दिवसात अनेक वेळा वाहत असल्याने जागो जागी खड्डे पडल्याने गटारी चे घाण पानी खड्यात भरले आहे. परिसरात ठीक ठिकाणी तलाव निर्माण झाले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या पायी चलणाऱ्या व वाहन धारकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घाण वास सह डासांच्या प्रमाण देखील वाढला आहे. अनेक वेळा लेखी तोंडी तक्रार करून ही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्ये चित्र पाहिला मिळाले.
काही दिवसा पूर्वी बातमी आल्या नंतर गटारिची साफसफाई करण्यात आली होती मात्र परिस्थिति जैसे थे झाली. सदर अक्कलकुवा ग्रामपंचायत च्या निवडणुक जाहिर झाले असून 18 डिसेम्बर रोजी मतदान होणार आहे. त्यात वार्ड क्र 4 व 5 साठी मतदान केंद्र हे न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज येथे असल्याने निवडणूक सम्बंधित विविध अधिकारी कर्मचारी आदि पाहणी साठी केंद्राला भेट देत असल्याने तसेच मतदानच्या येन 2 दिवसा अगोदर अक्कलकुवा ग्रामपंचायत प्रशासन जागा झाला असून न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वार जवळ पडलेले खड्डयान मध्ये तात्पुरते असे माती टाकन्यात येत आहे. तसेच गटारितुन नावाला असे घाण साफ करण्यात येत आहे