Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा

team by team
December 17, 2022
in राज्य
0
राज्यभरातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नंदुरबारात घटकसंच निर्मिती कार्यशाळा
नंदुरबार l  प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेले घटकसंच राज्यभरातील शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याने, ते अत्यंत गुणवत्तापूर्ण तयार केले जातील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री सतीश चौधरी यांनी केले. नंदुरबार येथे आयोजित घटक संच निर्मिती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डीएसके रेसिडेन्सी हॉटेलच्या सभागृहात जिल्ह्यातील निवडक शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय ब्लेंडेड मोड व ऑनलाईन घटक संच निर्मिती कार्यशाळा दिनांक 15, 16 व 17 डिसेंबर 2022 या कालावधीत संपन्न होत आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी  सतीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संशोधन विभाग प्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण, संशोधन उपविभागप्रमुख तथा अधिव्याख्याता श्री पंढरीनाथ जाधव, विषय सहायक  देवेंद्र बोरसे यांच्यासह घटक सच निर्मिती कार्यशाळेचे सुलभक केंद्रप्रमुख  हिरामण वाघ, विषय तज्ञ श्री आर आर पाटील हे उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध
 शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अध्यापक, विविध प्राथमिक व माध्यमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक यांच्या सहभागाने नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत कृती संशोधन व नवोपक्रम या विषयावर ब्लेंडेड मोड व ऑनलाईन घटक संच निर्मिती केली जात आहे.
या ठिकाणी निर्मित केलेले घटकसंच संपूर्ण राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शक ठरणार आहेत. या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी  सतीश चौधरी यांनी सांगितले की, आता प्रशिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. तसेच शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. यापुढे विविध शिक्षण व शिक्षणाच्या प्रक्रिया या अशाच पद्धतीने राबवल्या जाणे निश्चित आहे. नंदुरबार जिल्ह्यातील निवडक शिक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी हा घटक संच तयार केले जाणे, हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. तो गुणवत्तापूर्ण तयार करण्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी सर्व सहभागी संशोधकांना शुभेच्छा देताना कृती संशोधन व उपक्रमाच्या गरजा आणि महत्त्व विषद करून संशोधन करण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा मिळेल याची जाणीव ठेवून घटक संच निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले व सहभागी सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल २१ खेळ प्रकारात प्रावीण्य

Next Post

आमपाडा येथे एकल महिला मेळावा 

Next Post
आमपाडा येथे एकल महिला मेळावा 

आमपाडा येथे एकल महिला मेळावा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add