Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ओपन कुस्ती दंगल; अवघ्या ४ मिनिटात केला पराभव

team by team
December 13, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ओपन कुस्ती दंगल; अवघ्या ४ मिनिटात केला पराभव

नंदुरबार  l

येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे ओपन कुस्ती दंगल घेण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्हासह धुळे, जळगांव जिल्हा महाराष्ट्रातील अनेक पैलवानांनी हजेरी लावली. स्पर्धेचे विजेत्यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी अंतिम कुस्ती चुरशीची झाली. मुख्य कुस्तीत धुळे येथील लड्ड्या पहलवान उर्फ प्रमोद जाधव याने हरियाणा येथील तस्लिम शेख याचा अवघ्या ४ मिनिटात पराभव केला. लड्ड्या पैलवान २०२२ चा शरद क्रीडा महोत्सव केसरी ठरला.

येथील तालुका क्रीडा संकुल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सवेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस एन.डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जाकीर मिया जहागिरदार, राष्ट्रवादी युवक नंदुरबार तालुकाध्यक्ष ऍड.दिनेश माळी, विद्यार्थी सेलचे शहराध्यक्ष जयंत मोरे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत मुलींची कुस्ती नंदुरबारकरांना पहायला मिळाली. यावेळी अंतिम कुस्ती चुरशीची झाली. मुख्य कुस्तीत धुळे येथील लड्ड्या पहलवान उर्फ प्रमोद जाधव याने हरियाणा येथील तस्लिम शेख याचा अवघ्या ४ मिनिटात पराभव केला. लड्ड्या पैलवान २०२२ चा शरद क्रीडा महोत्सव केसरी ठरला. विजयी कुस्तीगीरांना सन्मानचिन्ह, पितळी गदा तसेच रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून बाळू पहेलवान, दिनानाथ जोहरी, जय मराठे, ईश्‍वर पहेलवान, रशिद हाजी, पावबा मराठे यांनी काम पाहिले.

स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, नायाब कुरेशी यांनी केले होते. स्पधार् यशस्वीतेसाठी अर्जुन तात्या मराठे, सागर पाटील, दादू मराठे, भैय्या पहेलवान, रोहित दाणेज, गिरीष मराठे, जितू ठाकरे, कालू पहेलवान, मयुर पहेलवान, योगेश मराठे, राहुल मराठे, आनंदा मराठे तसेच जय हनुमान व्यायाम शाळा व मारुती व्यायाम शाळेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५, रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार

Next Post

सशस्त्र सेना ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post
सशस्त्र सेना ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

सशस्त्र सेना ध्वजनिधीस प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add