Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहर पोलीसांची कारवाई करीत 48 हजाराचा गांजा केला जप्त, दोघांना अटक

team by team
December 12, 2022
in क्राईम
0
नंदुरबार शहर पोलीसांची कारवाई करीत 48 हजाराचा गांजा केला जप्त, दोघांना अटक

नंदूरबार l प्रतिनिधी

गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीसांची कारवाई करीत 48 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होवू नये म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे खूप संवेदनशील असून गांजा, अफु इत्यादी प्रकारचे अंमली पदार्थांची चोरटी वाहतूक, लागवड करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे अंमली पदार्थाची चोरटी वाहतूक, विक्री व लागवड यांचेवर कारवाई करणेसाठी त्याबाबतची माहिती घेत होते.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला एक इसम बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे पथकाने नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचला. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 16.45 वा. सुमारास नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरातून कंजरवाडा भागाकडे पायी पायी एक 19 ते 20 वर्ष अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला वयाचा इसम जातांना दिसला,

 

 

 

 

म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाला संशय आल्याने त्यास थांबवून सागर रविंद्र श्रीष्ट रा. गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार याच्या पाठीवर असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यात खाकी रंगाचे प्लॅस्टीकचेमध्ये गुंडाळलेले पाच पाकीट आढळून आले. सदरचे प्लॅस्टीकचे पाकीट उघडून पाहिले असता त्यात 48 हजार रुपये किमतीचा 3 किलो 200 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा मिळुन आल्याने गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन सागर रविंद्र श्रीष्ट रा. गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार व मुद्देमाल ताब्यात घेतला.

 

 

तसेच ताब्यात घेण्यात आलेला सागर श्रीष्ट यास गांजाबाबत विशवासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गांजा भुऱ्या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे याच्याकडून घेतल्याचे सांगीतले भु-या याचा शोध घेतला असता तो सरोजनगर भागात मिळुन आल्याने आरोपी सागर रविंद्र श्रीष्ट, भु-या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे रा. सरोजनगर, नंदुरबार याच्याविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

 

 

 

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक सागर आहेर, पोलीस हवालदार संदीप गोसावी, जगदीश पवार, पोलीस नाईक भटू धनगर, स्वप्निल शिरसाठ, बलविंद्र ईशी, स्वप्निल पगारे पोलीस अंमलदार हेमंत बारी, योगेश जाधव, इम्रान खाटीक, युवराज राठोड, विशाल मराठे, दिनेश चव्हाण, कल्पेश रामटके यांचे पथकाने केली असुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

इलेक्ट्रीक मोटार चोरणारे दोन अल्पवयीन मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

Next Post

उमर्दे खुर्द येथे आजपासून ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Next Post
उमर्दे खुर्द येथे आजपासून ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन

उमर्दे खुर्द येथे आजपासून ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add