म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुपग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी पॅनल प्रमुख डॉ.भगवान पाटील व अंबालाल अशोक पाटील यांनी सहा ही वार्डात आपापले उमेदवार जाहीर केले असून त्यांनी प्रचार कालपासून सुरू केला आहे.
यात ग्राम विकास पॅनल चे प्रमुख डॉ.भगवान पाटील व लोकशाही पॅनल प्रमुख अंबालाल अशोक पाटील यांनी गावात एकूण सहा वार्ड असून त्यांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.यात डॉ.भगवान पाटील यांनी सरपंच पदासाठी युवराज उत्तम ठाकरे तर सदस्य साठी वार्ड क्र१ येथे बिंदा रिवन ठाकरे, प्रकास खुशाल पाटील व वैशाली शुक्राम भिल , वार्ड क्र.२ येथे बाबूराव सन्या चोंगवे, रेखा बन्सीलाल मुसळे, उमेशा अशोक धनगर तर वार्ड क्र.३ येथे अशोक भगवान धनगर, रंजना सावन पवार, वार्ड क्र.४ येथे जितेंद्र ब्रिजलाल पाटील,लिलुबाई सुभाष वागले,अर्चना किशोर पाटील वार्ड क्र.५ येथे पमाबाई तारसिंग सुकळे, बेबी चुनीलाल अहिरे,सुनीता भगवान पाटील, वार्ड क्र.६ येथे शिवाजी राजू शेमळे, प्रकाश खुशाल पाटील, अक्काबाई रमेश ठाकरे असे जाहीर केले आहेत.
तर लोकशाही पॅनल प्रमुख अंबालाल अशोक पाटील यांनी सरपंच पदासाठी लक्ष्मण संपत शेमळे तर वार्ड क्र.१ येथे विजय सुकराम पवार,शशिकांत गोविंद पाटील,उषाबाई मंगु पवार , वार्ड क्र.२ येथे रोहीदास सोमा ठाकरे,सिंधुबाई रतीलाल शेमळे,छाया रजनीकांत सूर्यवंशी , वार्ड क्र.३ येथे भटू दयाराम धनगर, रुखमा शामा ठाकरे , वार्ड क्र.४ येथे चितांमन उत्तम धनगर,विमलबाई वसंत मोरे,सविता अंबालाल पाटील, वार्ड क्र.५ येथे भीमसिंग प्रताप सुकळे, गायत्री विजय अहिरे स्नेहा सचिन बेदमुथा, वार्ड क्र.६ येथे मगन शंकर भिल,सचिन किशोर बेदमुथा, शांतीबाई मोत्या भिल यांचा समावेश आहे.
तर अपक्ष सरपंच पदासाठी उमेदवार मदन मिथ्या पावरा, लक्मी सुभाष ठाकरे, विजय सुकलाल वाघे यांचा समावेश आहेत तर वार्ड क्र.३ येथे अपक्ष उमेदवार मुकुंद शंकर अहिरे , वार्ड क्र.४ येथे मिलिंद मुकुंद अहिरे, वार्ड क्र.५ येथे निर्मला मुकुंद अहिरे व ब्रिजलाल पौलाद मालचे तर वार्ड क्र.६ येथे मिलिंद मुकुंद अहिरे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होईल.








