नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील बलवंड शेत शिवारात ट्रॅक्टरमधून अचानक तोल जाऊन पडल्याने रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथील छोटू अक्वीत बच्छाव हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१८ बीआर ७१२८) शेतात हयगयीने व दुर्लक्ष करुन ट्रॅक्टर चालवित असतांना उभे राहून वाकून थुंकत असतांना अचानक तोल जाऊन ट्रॅक्टरखाली पडल्याने ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली व ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटावेटरमध्ये अडकून गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत हिरामण दगा बच्छाव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मयत छोटू बच्छाव याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.ज्ञानेश्वर सामुद्रे करीत आहेत.








