नंदुरबार | प्रतिनिधी-
खांडबारा गावात अवैधरित्या विनापास परवाना परमिटशिवाय देशीदारु बाळगुन विक्री करणार्या इसमास पकडुन त्याच्याकडुन २६ हजार ३९६ रुपये किंमतीची देशीदारु जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२०जुन रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन पाटील यांना गुप्त बातमीदार मार्फत खांडबारा गावात मेन बाजार गल्लीत के.एन.डी.बेकरीच्या बाजुला एका दुकानाच्या मागील बाजुस एक इसम देशीदारु कब्जात बाळगुन चोरटी विक्री करीत आहे.
अशी मिळालेल्या गुप्त बातमी वरुन सपोनि नितीन पाटील, पोसई भुषण बैसाणे व पोलीस पथक असे बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करता असतांना त्यांना एक इसम देशी दारु भरलेले खाकी पृष्ठाचे खोके कब्जात बाळगुन दिसुन आल्याने
त्याच्यावर छापा टाकुन जागीच पकडले त्याच्या ताब्यातुन २६ हजार ३९६ रुपये किंमतीचे देशीदारु टँगो पंच , सुगंधी संत्रा व महाराचा संत्राच्या एकुण ४४५ बाटल्या (१० खोके ) असा मुद्देमाल जप्त करुन पोका पिंटू किसन पावरा यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात मुकेश कांतीलाल पाटील रा . कुंभारगल्ली , खांडबारा याच्या विरूध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ ( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शाखाली सपोनि नितीन पाटील, पोसई भुषण बैसाणे, पोकॉ पिंटू पावरा, पोकॉ देवेंद्र हिरे , चापोना राजू कोकणी यांनी केली आहे.