Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुदद्वारात एअर ब्लोअर मशिन घातल्याने तरुण अत्यवस्थ, सुजलॉन कंपनीतील घटना

team by team
December 11, 2022
in क्राईम
0
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी

छडवेल कोर्डे ता.साक्री येथील सुजलॉन कंपनीच्या प्लांटमध्ये काल दुपारी कामगाराच्या गुदद्वाराला एअर ब्लोअर मशिनचा पाईप लावल्याने तरुणाच्या शरीरात हवेचा प्रचंड दाब जावून त्याच्या आतडया व किडनीला प्रचंड प्रमाणात इजा पोहचली आहे. या अत्यवस्थ तरुणाला सुरुवातीला शहरातील निम्स हॉस्पीटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर सुरतला हलविण्यात आल्याचे समजते.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, छडवेल कोर्डे ता.साक्री येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुजलॉन पवन उर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी असलेल्या प्लांटमध्ये अनेक कर्मचारी व कामगार कामाला आहेत. प्लांटमध्ये काम करतांना अंगावर व कपडयांवर कारखान्याच्या विविध पार्टचे कण उडत असल्याने ते स्वच्छ करण्यासाठी एअर ब्लोअर मशिन ठेवण्यात आले आहेत. या मशिनवरुन सर्व कामगार अंगावर हवेचा दाब  देवून अंगावरील व कपडयांवरील कण स्वच्छ करत असतात.

 

 

 

काल दि.९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास छडवेल कोर्ड येथील एक २० वर्षाचा कंत्राटी काम करणारा तरुण आपले काम आटोपून या एअर ब्लोअर मशिनजवळ आला. त्याने अंगावर हवेचा दाब देवून साफ केले. मात्र, त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या दोघा कामगार तरुणांनी सदर मशिन त्या तरुणाच्या गुदद्वाराला लावले व हवेचा दाब वाढवला. त्यावेळी हवेचा प्रचंड दाब असल्याने सदर तरुणाच्या शरीरात हवा जावू आतडे फुगून मोठया प्रमाणावर इजा झाली आहे. तसेच किडणीलाही मोठया प्रमाणावर दुखापत झाली आहे. त्यामुळे या तरुणाला सुजलॉन कंपनीच्या वैद्यकीय पथकाने शहरातील निम्स हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे.

 

 

मात्र, त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सुरतला हलविण्यत आल्याचे समजते. घटना घडताच दोघे तरुण फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

दरम्यान, पाच ते सहा वर्षापुर्वी अशाचप्रकारची घटना घडली होती. परंतू त्यावेळी हवेचा दाब कमी असल्याने संबंधीत कर्मचार्‍याला कमी प्रमाणावर इजा झाली होती. मात्र, काल घडलेल्या या प्रकारामुळे सुजलॉन कंपनीत सुरु असलेला भोंगळ कारभार चव्हाटयावर येवू लागला आहे. याबाबत सुरुवातीला निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे व तेथून शून्य क्रमांकाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे समजते.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव येथे मोबाईल चोरणार्‍यास अटक

Next Post

बॅटरी चोरी करणारी टोळी गजाआड, दोघा अल्पवयीनसह चौघांना अटक

Next Post
तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

बॅटरी चोरी करणारी टोळी गजाआड, दोघा अल्पवयीनसह चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add