Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे मोबाईल चोरणार्‍यास अटक

team by team
December 11, 2022
in क्राईम
0
गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची गुन्हेगारांविरुध्द् धडक कारवाई

नंदुरबार | प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील उमराणी बु. येथील दारासिंग गोमच्या पावरा यांच्या घरातून ३ हजाराचा मोबाईल चोरणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.९ डिसेंबर २०२२ रोजी धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील काकावाडी येथे एक इसम बील नसलेला महागडा मोबाईल कमी किमतीत विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले.पथकाला धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील काकावाडी परिसरात एका झोपडीच्या आडोश्याला एक संशयीत इसम मिळून आला.

समिर अकिल पठाण (वय २२ रा.काकावाडी, धडगांव) असे त्याचे नाव आहे.  त्याने सुमारे १५ ते २० दिवसापूर्वी उमराणी बु. येथे रात्रीच्या वेळी एका उघड्या घरातून सदर मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे. त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक पुरुषोत्तम सोनार, दीपक न्हावी, किरण मोरे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता राज्यस्तरीय समितीकडून  लहान कडवान ग्रामपंचायतीची पाहणी

Next Post

गुदद्वारात एअर ब्लोअर मशिन घातल्याने तरुण अत्यवस्थ, सुजलॉन कंपनीतील घटना

Next Post
चाकू घेवून फिरणाऱ्याविरोधात गुन्हा

गुदद्वारात एअर ब्लोअर मशिन घातल्याने तरुण अत्यवस्थ, सुजलॉन कंपनीतील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add