नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील वडझाकण येथून चोरट्याने ट्रॅक्टरची बॅटरी चोरुन नेल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वडझाकण येथील विकास भरत पाडवी यांच्या मालकीचे ट्रॅक्टरचे घराच्या अंगणात असतांना चोरट्याने संधी साधून राहूल लक्ष्मण भील व परेश परविन पाडवी यांनी सदर ट्रक्टरची ८ हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरुन नेली. याबाबत विकास पाडवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वंतू गावित करीत आहेत.









