नंदुरबार | प्रतिनिधी
विसरवाडी-नंदुरबार रस्त्यावर दुचाकीस्वाराने पादचारी इसमास धडक दिल्याने त्याचा झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील अमोल गावीत यांच्या शेतासमोर नितेश गावीत याने त्याचा ताब्यातील मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-के.००४५) ही नंदुरबारकडून विसरवाडीच्या दिशेने जात असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात चालविली त्यावेळी धिरसिंग रडत्या गावीत हे समोरून पायी येत असतांना त्यांना समोरून ठोस मारली.
यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. यात धिरसिंग रडत्या गावीत रा.भरडू ता.नवापूर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विशाल सुनिल गावीत रा.भरडू (ता.नवापूर) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात नितेश रडत्या गावीत रा.हळदाणी (ता.नवापूर) याच्याविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ)२७९, ३३७, ३३८ सह मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार अरूण कोकणी करीत आहेत.