Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलजन्य आजारावर नियंत्रणासाठी “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियान प्रभावीपणे राबवा : जि . प . अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत

team by team
December 9, 2022
in राजकीय
0
जलजन्य आजारावर नियंत्रणासाठी  “स्वच्छ जल से सुरक्षा” अभियान प्रभावीपणे  राबवा : जि . प . अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत
नंदुरबार l प्रतिनिधी
जलजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध
होण्यासाठी “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबवून जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे . तसेच जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ग्रामस्तरावर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा  परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी केले .
     जल जीवन सर्वेक्षण२०२३ अंतर्गत  “स्वच्छ जल से सुरक्षा “  या अभियानाचा शुभारंभ नंदुरबार  जिल्हास्तरावर जिल्हा  परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी  उपस्थिताना  मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे महिला व बालकल्याण सभापती संगीताताई  गावीत  ,शिक्षण सभापती गणेश पराडके , कृषि व पशू संवर्धन सभापती हेमलता शितोळे, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी ,  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक (DRDA) आर.पी.पाटील,.प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन)जयवंत उगले,कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) .संजय बाविस्कर,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं), जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी,कार्यकारी अभियंता (लघुसिंचन),उपस्थित होते.
           जिल्ह्यात दि. १  ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा  हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व स्त्रोतांचे व नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगींग,पाणी गुणवत्ता परीक्षण,  मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे पाणी गुणवत्ता परीक्षण, ग्रामस्तरावर ग्रामसेवक,आरोग्य सेवक ,जलसुरक्षक,गाव स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या  महीलां मार्फत पाणी नमुने गोळा करणे, पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी करणे व त्याची माहिती  संकेतस्थळावर अद्यावत करणे.तसेच एफ टी के  किटची उपलब्धता,ग्रामपंचायतनिहाय प्रा.आ.केंद्र स्तरावरिल ,व  त्याद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी या सर्व बाबी अभियान स्वरूपात दि.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.
 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ  गावडे यांनी सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे व पाणी पुरवठा योजनांचे Geo Tag सह प्रयोगशाळेत तसेच ग्रामस्तरावर एफ टी के  द्वारे विहीत मुदतीत 100 टक्के  स्त्रोतांचे रासायनिक व जैविक तपासणी करुन घेण्याचे सर्व संबंधित विभागांना निर्देश दिले.
याप्रसंगी  ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक व ग्रामसेवक यांना  जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत व सर्व सभापती व  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ  गावडे यांच्या हस्ते रासायनिक व जैविक एफ टी के   किटचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ  नितीन पाटील यांनी केले,तर सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  सुनिल पाटील यांनी केले.आभार  कैलास कांजरेकर यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

Next Post

एकाचा मृत्यूप्रकरणी पोलीस कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा

Next Post
पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, पाच पोलीस कर्मचारी जखमी, एक दुचाकी स्वार, दोघांची प्रकृती गंभीर

एकाचा मृत्यूप्रकरणी पोलीस कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add