नंदूरबार l प्रतिनिधी
ब्लडफॉर बाबासाहेब आंबेडकर अभियानाअंतर्गत संकल्प निर्माण फाउंडेशनचा वतीने 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित 66 रक्तदात्यांनी रक्तदानातून बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन केले.
नंदुरबार येथील संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे ब्लड फॉर बाबासाहेब या अभियाना अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 व्या महापरिनिर्वाण दिनी संकल्प निर्माण फाउंडेशन तर्फे 66 रक्तदात्यांकडून बाबासाहेबांना रक्तदान कृतिशील अभिवादन केले. ब्लड फॉर बाबासाहेब या अभियानाद्वारे आंतरराष्ट्रिय स्थरावर 7 देशात व 22 राज्यात बाबासाहेबांना कृतिशील अभिवादन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे न पा मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी उदघाटन केले.उदघाटना प्रसंगी सुरवातीला सोनल बैसाणे अशोक शिरसाठ यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा , जिल्हा परिषद मुख्याधिकारी रघुनाथ गावडे , नगर पालिकेतील मुख्याधीकारी अमोल बागुल, डॉ. रमा वाड़ीकर ,संकल्प निर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल महिरे, सचिव नंदू बैसाणे , सुरेश जावरे, डॉ राजेश मेश्राम, प्रा. विलास पंडित, प्रा बाळकृष्ण तायडे, सुनील निकुंभ, प्रराग जगदेव,राहुल निकम, राहुल धोढरे, रविशंकर सामुद्रे, बापु साळवे, विनोद सामुद्रे, राजेंद्र बोराळे, प्रमोद मोरे, भाऊराव बिरारे, अरुण रामराजे, आप्पा वाघ ,अशोक शिरसाठ, संजू रगड़े,राजेंद्र महाले,विजय वाघ, सुभाष महिरे, प्रवीण वाघ, बॉबी बैसाणे, प्रविण ब्राम्हणे, विश्वास पवार, शितल पाटील, डॉ.मोनिका वसावे, प्रीतेश पानपाटील, भावेश ठाकरे, सोनाली कुलकर्णी, सुनील साळवे, सुनील महिरे यांनी प्रस्ताविक केले.
नंदू बैसाने यांनी आभार मानले.संकल्प निर्माण फाउंडेशनचा वतीने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.