नंदुरबार l
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील जामली फाट्याजवळ कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील भोई गल्लीत येथील सचिन जगदिश भोई हे दुचाकीने (क्र.एम.एम.३९ एई १२१८) खापरकडून शहाद्याकडे जात होते. यावेळी एका कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर (क्र.एन.एल. ०१ एए ३५५९) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात कंटेनर चालवून जामली फाट्याजवळ दुचाकी धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात सचिन भोई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत गणेश जगदिश तावडे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ४२७ सह मोटर वाहन कायदा लम १८४, १३४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास वडघुले करीत आहेत.