नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल व ज्यु. कॉलेज नंदुरबार येथे श्रीमद् भगवत गीता जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनी श्रीमद् भगवत गीता ग्रंथाची पुजा केली. तदनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी श्लोक तसेच गीता ग्रंथाची भगवतगीतेतील निवडक स्त्रोत्र म्हणत गीता जयंती साजरी करण्यात आली.प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनी हिंदु धर्मात गीता ग्रंथ किती महत्वाचे आहे. तसेच गीतेत भगवान श्री कृष्णांनी अर्जुनास दिलेला उपदेश किती महत्वाचा आहे व प्रत्येकाने गीतेचा अवलंब केला पाहिजे हे त्यांनी आपल्या वक्तव्यातुन स्पष्ट करुन दिले.
तसेच प्रत्येक घरात गीता ग्रंथाचे वाचन झालेच पाहिजे व ते म्हणाले. ‘गीता से क्या नाता है गीता हमारी माता है’ असा नारा देत त्यांनी भाषणाला पुर्ण विराम दिला. तसेच संस्थेचे चेअरमन किशोरभाई वाणी, व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी यांनी गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.