नंदुरबार | प्रतिनिधी
नवापुर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये अटकेत असलेले दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी लॉकअपच्या खिडक्या तोडुन फरार झाल्याची माहीती समोर येत आहे. यापैकी एकास गुजरात पोलीसांनी पकडले असुन उच्छल पोलीस ठाण्यात आनन्यात आले.
सुत्रांनी दिलेल्या प्राथमीक माहितीनुसार, नवापूर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना आज सोमवार ५ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान त्या आरोपींना अटक करून पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेल्या खिडकीची गज तोडुन हे आरोपी आज सकाळी ८ ते ८.३० वाजे फरार झाली आहे. खिडकी तोडून त्यांनी पलायन केल्याचे पोलिसांना आढळून आले. नवापूर पोलीस ठाण्याची लोकअप असलेली इमारत ब्रिटिश कालीन व जुनाट आहे. खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयन वरच पोबारा काढत हे आरोपी ऊसांच्या शेतामध्ये फरार झाले आहेत.
पोलीस यांच्या मागावर असुन ज्या शेतात आरोपी फरार झाले आहेत. त्या शेतांना पोलीसांनी विळखा देखील टाकला आहे. मात्र आरोपींच्या फरार होण्याने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची नाचक्की झाली असुन याबाबत पोलीस दलातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. मात्र प्रत्यशदर्शी गुराखी आणि शेतकरी यांनी या घटनेबाबत माहीती दिली आहे.
दरम्यान यापैकी एकास गुजरात पोलीसांनी पकडले असुन उच्छल पोलीस ठाण्यात आनन्यात आले.याबाबात पोलीसांनी आरोपींचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत.