Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तगडा बंदोबस्त : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली सारंगखेडा यात्रेची पाहणी

team by team
December 5, 2022
in राज्य
0
तगडा बंदोबस्त : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली सारंगखेडा यात्रेची पाहणी

सारंगखेडा l प्रतिनिधी

 

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या ७ डिसेंबर पासून दत्त जयंतीनिमित्ताने यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आढावा बैठक घेत यात्रेची पाहणी केली.

श्री. दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली. पी. आर. पाटील यांनी घोडेबाजार, चेतक फेस्टिव्हल चे पटांगण, अश्व शर्यतीसाठी तयार झालेले रेसिंग ट्रॅक, टेंट सिटी तसेच यात्रा परिसराची पाहणी केली. कायदा सुव्यवस्था व पोलीस प्रशासनाने खबरदारी बाळगत काम करावे. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यात्रेत आलेल्या पर्यटकांना कसलीही गैरसीय होणार नाही याची काळजी घ्यावी.

 

 

 

शक्य झल्यास गावातील तरुण मुलांना स्वयंसेवक पोलीस मित्र म्हणून जोडून घ्याव्यात व यात्रा सुरळीत पडावी. यात्रेत कायदा सुव्यस्थेची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सारंगखेडा यात्रेत कुठलेही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासनाकडून ६ पोलीस निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, १५० पोलीस कॉन्स्टेबल, १५० गृहरक्षक यात्रेसाठी तैनात केले जातील. अशी माहिती पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

 

 

जयपालसिंह रावल यांनी चेतक महोत्सवामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यंदा होणाऱ्या चेतक एक्वाइन प्रीमियर लीग संदर्भात माहिती दिली. तसेच दोन दिवसात घोड्यांची आवक वाढेल व ३ हजाराहून अधिक घोडे दाखल होते अशी माहिती दिली. तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांनी आपली कामे चोख पार पाडावीत. कुठल्याही कामात दिरंगाई न करता शक्य होईल तेवढी मदत प्रशासनाने सामान्य नागरिकांपर्यत पोहचावी. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले व स्थानिकांच्या मदतीने येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या प्रयत्न करावा.

 

 

 

चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, दत्त मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अंबालाल पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील, ट्रस्टी रमेश पाटील,

 

 

 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे, जिल्हा विशेष शाखा पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक एस.एन. कोळी, पोलीस निरीक्षक योगेश कोळी, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस.एन. डिगराळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व प्रशासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर आपल्याला जगण्याची कला शिकवितात : जि.प. शिक्षण सभापती गणेश पराडके

Next Post

अरे बापरे : दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेलच्या खिडकी तोडुन फरार, एकास पकडले

Next Post
अरे बापरे : दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेलच्या खिडकी तोडुन फरार, एकास पकडले

अरे बापरे : दरोड्याच्या गुन्ह्यातील पाच आरोपी जेलच्या खिडकी तोडुन फरार, एकास पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add