Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात पेचरीदेव ग्रामपंचाय बिनविरोध

team by team
December 5, 2022
in राजकीय
0
आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात पेचरीदेव ग्रामपंचाय बिनविरोध
नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया अक्कलकुवा तहसील कार्यालयात सुरू आहे. नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्यातील पेचरीदेव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची बिनविरोध निवड  झाली आहे त्यामुळे शिवसेनेने एक ग्रामपंचायत बिनविरोध करुन निवडणूकीवर आपले वर्चस्व राखले आहे.
        28 नोव्हेंबर पासून तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जात होते. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवशी तालुक्यातील पेचरीदेव ग्रामपंचायतीचे थेट लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेने जिल्हा प्रमुख आमदार आमश्या  पाडवी यांच्या नेतृत्वाखाली कोयलीविहीर ग्रामपंचायत बिनविरोध राखली होती.त्यानंतर लगेच होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार आमश्या पाडवी यांनी या निवडणुकीत देखील आपला करिष्मा कायम ठेवत पेचरीदेव ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार पेचरीदेव ग्रामस्थांनी सामंजस्याने निर्णय घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत हुरजी वसावे यांची बिनविरोध निवड केली आहे. त्यांच्यासोबत मैनाबाई नरपत वसावे,आसाराम सोना वळवी, मालतीबाई अभिमन वसावे, लीला गोविंद वसावे, जीवनदास पारत्या वसावे, काथुडीबाई दीपक वसावे, महेश संपत वसावे या सात सदस्यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.
संध्याकाळी या उमेदवारांच्या विरोधात कोणीही नामनिर्देशन पत्र सादर केले नसल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. यावेळी शिवसैनिकांनी संपर्क कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला .या निवडणुकीत देखील शिवसेनेने एक ग्रामपंचायत पुन्हा बिनविरोध करुन निवडणुकीवर आपले वर्चस्व राखले आहे.
नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशीच तालुक्यातील बिनविरोध झालेल्या पेचरीदेव ग्रामपंचायतीचे नव निर्वाचित सरपंच व सदस्यांचा शिवसेना संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
         सरपंच वसंत हुरजी वसावे  तयांच्यासोबत मैनाबाई नरपत वसावे,आसाराम सोना वळवी, मालतीबाई अभिमन वसावे, लीला गोविंद वसावे, जीवनदास पारत्या वसावे, काथुडीबाई दीपक वसावे, महेश संपत वसावे या सात सदस्यांचा जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख तथा आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांना पेढे भरुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसैनिकांनी कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला.यावेळी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी,जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले,तालुका प्रमुख मगन वसावे,माजी सरपंच जी.डी.पाडवी,अश्विन तडवी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचे आयोजन

Next Post

काय सांगताय :दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांसाठी मोजावे लागणार आता पैसे

Next Post
काय सांगताय :दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांसाठी मोजावे लागणार आता पैसे

काय सांगताय :दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांसाठी मोजावे लागणार आता पैसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add