नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र गुजरात धुळे नंदुरबार अशा दोन राज्यांच्या आणि दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात आजपर्यंत हजारोंच्या संख्येने अपघात झाले आहे. व नागरिकांचे बळी गेले आहेत. परंतु प्रशासनाने घाट रस्त्याच्या दुरुस्ती कडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

वारंवार अपघातांचे सत्र सुरूच आहे आज सकाळी सहा वाजता मालेगाव हुन गुजरात राज्यात जाणारा. कांद्यांनी भरलेला ट्रक तीव्र उतारावर ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कांदेही पूर्णपणे बाहेर पडुन दरीमध्ये फेकले गेले. या अपघातात सहचालक अपघातादरम्यान बाहेर उडी मारून फेकला गेला.
तर चालक ट्रकमध्ये अडकून पडल्याने गंभीर रित्या जखमी झाला आहे. बोरझोर गावाचे पोलीस पाटील भीमा गावित यांनी नवापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी नवापूर पोलीस दाखल झाले आहे. दरम्यान बोरझर गावातील नागरिकांनी जखमी चालकाला बाहेर काढून 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नवापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
चरणमाळ तीव्र घाटाच्या उतारात वारंवार अपघात असून बांधकाम विभागाकडून पाहिजे तशी दुरुस्ती केली जात नाही. तसेच वळणाचा व अति तीव्र उताराचा घाट रस्ता असल्याने या मार्गावरून अवजड वाहने. तसेच खाजगी प्रवासी लक्झरी बस वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक सुरुच असल्याने अपघातांचे सत्र सुरू आहे.