Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा

team by team
December 4, 2022
in क्राईम
0
श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा
नवापूर l प्रतिनिधी
दिल्ली येथे अत्यंत क्रूरपणे घडलेल्या श्रध्दा वालकर हत्याकांड प्रकरणाचा निषेधार्त सकाळी दहाला शहरातील गणपती मंदीरा पासुन समस्थ हिंदु समाजातर्फे मुक् मोर्चा काढण्यात आला.
मुक् मोर्चा श्री गणपती मंदीरा पासुन सुरुवात करत मोर्चा सरदार चौक, शिवाजी रोड, कुंभारवाडा, महात्मा गांधी पुतळा, लिमडावाडी, लाईटबाजार या मार्गाने फिरुन तहसिल कार्यालयाच्या आवारात सांगता करण्यात आली. तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदना मध्ये म्हटले आहे की,  राजधानी दिल्ली येथे अत्यंत क्रूरपणे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा आम्ही  नवापूर सकल हिंदु समाजच्या वतीने निषेध नोंधवत आहेत.  श्रद्धा हिला ज्या प्रकारे क्रूरपणे ठार मारण्यात आले त्याने संपूर्ण समाजात प्रचंड रोष आहे, महिला व पालक चिंतेत व भयभीत आहेत, सदर घटना फक्त जघण्य अपराध नसून लव्ह जिहादचे षडयंत्र आहे, आणि दिवसोंदिवस अश्या या घटना संपूर्ण देशात व आपल्या तालुक्यात, नवापूर शहरात व परिसरात पण वाढत आहे. मुळात लव्ह जिहादचे बरेच प्रकार आपल्या तालुक्यात सुद्धा घडले आहेत, महिला भगिनींना प्रेमजाळात फसवून बळजबरी धर्मांतर करण्याचे षडयंत्र काही असामाजिक तत्व करतात. त्यांना मदत करणारी टोळी सक्रिय असते. आपल्या तालुक्यात ही अश्या घटना घडवून आणणाऱ्या असामाजिक तत्वांवर लक्ष केंद्रित झाले पाहिजे,
महिला भगिनींच्या छेडती आणि रोड रोमियो बद्दल झालेल्या तक्रारी बाबत प्रशासनाने योग्य वेळी अत्यन्त तातडीने गांभीर्याने कार्यवाही केली पाहिजे. शाळा, कॉलेज आणि तत्सम परिसरात करडी नजर ठेवली पाहिजे, जेणे करून अश्या घटनांना आळा बसेल, लव्ह जिहाद या विषयावर त्वरित कायदा करून हिंदू तरुणींवर होणारा छळ कुठे तरी थांबला पाहिजे, शासनाला निवेदन करू इच्छितो की लव्ह जिहाद या समस्येवर शासनाने कडक कायदा बनविला पाहिजे. हत्याकांड घडवणाऱ्या अपराध्यास अत्यंत कडक शिक्षा
मिळावी अशी आमची मागणी आहे.
निवेदनावर हिंदु समाजाचे राजेंद्र गावीत, दर्शन पाटील,जितेंद्र अहिरे,किरण टिभे,नगराध्यक्षा सौ हेमलता पाटील,नगरसेवक महेंद्र दुसाने, विशाल सांगळे,हंसमुख पाटील,अनिल वारुडे,राहुल मराठे,संदिप पाटील,घनश्याम  परमार, निलेश प्रजापत, माजी नगरसेविका सुनिता वसावे,जिग्नेशा राणा ,हेमंत शर्मा,शंभू सोनार,अजय अग्रवाल सह असंख्य हिंदु समाजाचे पुरुष महिला यांच्या सह्या आहेत.
यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,अ.स.इ विकास पाटील,निजाम पाडवी,विनोद पराडके,कैलास तावडे,रणजीत महाले सह पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस ठेवला होता.
बातमी शेअर करा
Previous Post

अरे बापरे : विषारी वनस्पतीच्या बिया खाल्याने सात विद्यार्थ्यांना विषबाधा

Next Post

दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन

Next Post

दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add