Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

team by team
November 30, 2022
in क्राईम
0
तीन जिल्ह्यात ३१ घरफोड्या करणारा सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरासह इतर जिल्ह्यात तब्बल ३१ घरफोड्या करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने नंदूरबार येथील रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली असून सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

 

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दि.२०ऑक्टोबर रोजी महेश कोमलसिंग गिरासे यांच्या मालकीचे गांधीनगर परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ असलेले मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले १५ हजार रोख अज्ञाताने चोरुन नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीसांकडून तपास सुरू असतांना काल दि. २९ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या चोरीतील संशयित हा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याचे समजले.

 

 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या इसमास ताब्यात घेतले. तो मुकबधिर असल्याने त्याने त्याचे नाव लिहून दगडूबा मुकुंदा बोर्डे रा.पेरजापूर ता.भोकरदन जि.जालना असे सांगितले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सात हजार ५४० रुपयांची रोकड आढळून आली.त्याने हातवारे करुन व लिहून मेडीकल दुकान फोडल्याची कबुली दिली.

 

संशयित दगडूबा मुकुंदा बोर्डे हा मुकबधिर असल्याने नंदुरबार शहरातील मेडीकलमध्ये चोरीची कबुली दिली.तसेच त्यास मुकबधीर इसमांची भाषा माहिती असलेल्या मुकबधीर विद्यालयातील शिक्षकांकडून इतर चोरीच्या घटनांबाबत विचारपूस केली असता त्याने खांडबारा, अक्कलकुवा, रनाळे, जळगांव जिल्ह्यातील भुसावळ व साक्री जि.धुळे या ठिकाणी चोरी केल्याचे हातवारे करुन व कागदावर लिहून सांगितले. त्यावरून जिल्हा घटाकातील व इतर जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हे अभिलेख पडताळून पाहिले असता तेथे नंदुरबार शहर पोलीस ठाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे, विसरवाडी, अक्कलकुवा, साक्री जि.धुळे, बाजार पेठ भुसावळ पोलीस ठाणे जि.जळगांव येथे ३१ गुन्हे दाखल आहेत.

 

पुढील तपासकामी त्यास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक राकेश मोरे, मोहन ढमढेरे, पोलीस शिपाई अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील या भागात मद्यविक्रीस बंदी

Next Post

अरे व्वा: जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पामुळे २ हजार ६१३ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

Next Post
अरे व्वा: जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पामुळे २ हजार ६१३ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

अरे व्वा: जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पामुळे २ हजार ६१३ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add