नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गवळीवाडा येथे समजाविण्यासाठी गेले असल्याचा राग आल्याने फायटरने मारुन दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील गवळीवाडा येथे लग्नात नाचत असतांना साक्षीदार सागर कोतवाल यास धक्का लागला. यावेळी मनोज महादू गवळी हे समाजाविण्यासाठी गेला. याचा राग आल्याने दादू सिताराम भोई, धिरज दिलीप भोई, रामू बापू मराठे व कृष्णा दिलीप भोई यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच दादू भोई याने फायटरने मारुन दुखापत करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत मनोज गवळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अतुल बिऱ्हाडे करीत आहेत.








