म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन विद्या गौरव इंग्लिश मेडियम स्कुल आमलाड येथे संपन्न झाले.
यात १७ व १९ वर्ष वयोगटात नेमसुशिल शाळेने अजिंक्य पद मिळविले आले. अध्यक्षस्थानी ललित पाठक यावेळी तालुका संयोजक सुनिल सूर्यवंशी ललित पाठक यांनी क्रिडा संयोजक सुनील सूर्यवंशी व राम सूर्यवंशी यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील नेमसुशील विद्या मंदिर तळोदा,विद्या गौरव ईंग्लिश मीडियम स्कुल आमलाड,शेठ के.डी., हायस्कुल तळोदा या शाळेतील खेळाडु सहभागी झाले होते.
या स्पर्धा १४.१७.१९ .वर्ष वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या सुरुवातीस विद्या गौरव आमलाड व नेमसुशील विद्या मंदिर तळोदा यांच्यात झाला यात नेमसुशील विद्या मंदिर तळोदा यांचा संघ विजयी झाला तर उप विजेता विद्या गौरव आमलाड हा संघ ठरला.त्यानंतर १९ वर्ष वयोगटातील विद्या गौरव आमलाड व नेमसुशील विद्या मंदिर तळोदा यांच्यात झाला यात विजयी नेमसुशील विद्या मंदिर तळोदा तर विद्या गौरव आमलाड या संघ उप विजेता ठरला.त्यानंतर १४ वर्ष वयोगटात मुलांचा विजेता संघाला देण्यात आला.
सर्व यशस्वी खेळाडू चे अभिनंदन यावेळी करण्यात आले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रिडा संयोजक क्रिडा संयोजक सुनील सूर्यवंशी व राम सूर्यवंशी,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव तसेच पंच म्हणून रामचंद्र सूर्यवंशी,वेळ अधिकारी निषाद माळी व तुषार शिंपी,दशरथ पाडवी. सी.जी. वळवी, प्रवीण वसावेआदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमा चे प्रस्तजिक व सूत्र संचालन क्रिडा शिक्षक पुलायन जाधव यांनी केले.








