नंदुरबार l प्रतिनिधी
विरोधक आमच्यावर उठसुठ आरोप करीत आहेत. भविष्यात देखील आरोप होणारच आहेत.आमच्या गद्दार, धोकेबाजीचे शिंतोडे उडविण्यात येत आहेत. परंतु,आपण विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देता जनतेच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. जल जीवन मिशन योजनेत जे आडवे येतील त्यांच्या सत्यानाश होईल अशी टीका राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेची जाहीर सभा घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून शनिमांडळमध्ये दोन वर्षात पाणी आणण्याच्या प्रयत्न करण्यात येईल. विरोधक आमच्यावर उठसुठ आरोप करीत आहेत. धोका, गद्दारी केल्याच्या टीका करण्यात येत आहे. मग प. बंगालमध्ये पडलेल्या धाढीत २७ कोटी पकडले गेले.त्यावेळी पैसे भरण्यासाठी टेम्पो लागला. मग, ५० कोटींसाठी ट्रक लागायला पाहिजे होता.
सभेचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सयाजीराव मोरे यांनी केले.यावेळी व्यासपीठावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी,जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे, धडगाव नगरपंचायतीचे धनसिंग पराडके, जि.प सदस्य जागृती मोरे,पं.स सभापती माया माळसे,माजी जि.प सदस्य डॉ सयाजीराव मोरे,उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जि प सदस्य देवमन पवार, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,सरपंच वर्षा मोरे, पं.स सदस्य कमलेश महाले,छाया पवार, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, तालुकाप्रमुख रवींद्र गिरासे,मुन्ना पाटील,तीलालीचे सरपंच स्मिता पाटील आदी उपस्थित होते.