नंदुरबार l
नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील बाजार चौकात चार दुकाने चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील बाजार चौकातील कृषी सेवा केंद्र दुकान, मोबाईल दुकान, फरसाण दुकान व किराणा दुकान अशा चारही दुकानांचे कुलूप लोखंडी सळईने तोडून चोरट्याने दुकान प्रवेश केला.
दुकानात असलेल्या सामान अस्तावस्त करीत चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोणीतरी येण्याची चाहू लागल्यामुळे चोरटा तेथून पळून गेला. याबाबत किशोर सुकदेव गोसावी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत.