नवापूर l प्रतिनिधी
खांडबारा- नंदुरबार रस्त्यावरील काळंबा फाट्याजवळ महावितरण कंपनीचे पिकप वाहन आणि दुचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकी वरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील दोन्ही तरुण रस्त्यावरून लांब शेतामध्ये फेकले गेले. यात एका तरुणाच्या हाताचे दोन तुकडे झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. महावितरण कंपनीचे पिकप वाहन डीपी घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकल बरोबर समोरासमोर भीषण अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार राहुल केवजी नाईक रा. मोगराणी ता. नवापूर व दुसरा तरुण कोठली येथील रहिवासी महेश नावाचा युवक या दोन्ही मयतांचे शव जिल्हा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. दि २३ रोजी पोलीस प्रशासनाने सरकारी वाहनावर कारवाई करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे.
खांडबारा नंदुरबार रस्त्यावर काळंबा फाटा जवळ 22 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता. नंदुरबार हुन मोगराणी येथे घरी जाणाऱ्या दुचाकी वरील राहुल केवजी नाईक रा.मोगराणी. व महेश रा. कोठली यांना खांडबाराहून नंदुरबार कडे येणाऱ्या विद्युत महावितरण कंपनीच्या पिकप वाहनाचा एक्सेल तुटून अनियंत्रित झाल्याने समोरून येणाऱ्या दुचाकी स्वारांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
सदर अपघाताबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून. विद्युत महावितरण कंपनीच्या पिकप वाहनाच्या चुकीमुळे दोन तरुणांचा जीव गेला असून. पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच पीडित कुटुंबांना आर्थिक मदत करून न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.