शहादा l प्रतिनिधी
येथील आदर्श नगर भागात सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून दीड तोळे सोने, पाच हजार रुपये रोख रक्कम व एक एलईडी टीव्ही असा सुमारे एक लाख रुपये पेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल चोरून नेल. रात्री उशिरापर्यंत याबाबत शहादा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहादा शहरातील आदर्श नगर भागात विनायक बाविस्कर या शिक्षकाच्या घरी सदर चोरी झाली आहे. बाविस्कर हे गुरुवारी आपल्या खाजगी कामानिमित्त गावी गेले होते आज दुपारी त्यांना त्यांच्या शेजारच्या लोकांनी फोन करून सांगितले की तुमचे घर उघडे आहे त्यानंतर ते सायंकाळी उशिरा घरी दाखल झाल्यानंतर त्यांना घराच्या आतील बेडरूम मधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले तसेच बेडरूम मधील दोन्ही कपाट फोडलेले आढळले.

आपल्या घरी चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर बाविस्कर यांनी याबाबत शहादा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी व ठसे तज्ञांचे पथक दाखल झाले पोलिसांसमोर बाविस्कर यांनी कपाटाची तपासणी केली असता त्यातील पाच हजार रुपये रोख रक्कम सुमारे 75 हजार रुपये किमतीचे दीड तोळे सोने व 30 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून गेल्याची खात्री झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत याबाबत शहादा पोलिसात नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
गेल्या आठवड्यापासून शहरात दररोज घरफोड्या होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.