Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा : यंदा जिल्ह्यात साजरा होणार होळी महोत्सव , आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आदेश

team by team
November 21, 2022
in राजकीय
0
अरे व्वा :  यंदा जिल्ह्यात साजरा होणार होळी महोत्सव , आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आदेश
नंदुरबार । प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्हयात यावर्षी होळी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
 जिल्हा नियोजन व विकास समितीची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. डॉ. गावित बोलत होते. ना. डॉ. गावित म्हणाले, राज्यात विविध महोत्सव साजरे करण्यात येतात.
होळी हा आदिवासी बांधवांचा महत्वाचा आणि मोठा उत्सव असतो. जिल्हयातील काठी, मोलगी, तोरणमाळण, धडगाव या भागात होलिकोत्सव विविध दिवशी साजरा करण्यात येतो. यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडत असते. परंतू हा उत्सव व्यापक स्वरुपात साजरा व्हावा यासाठी जिल्हयात होळी महोत्सव साजरा करण्याची संकल्पना आहे. या महोत्सवाचा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. लवकरच त्यासंदर्भात नियोजन केले जाणार आहे. या महोत्सवात दिव्यांगांसाठीदेखील कार्यक्रम असतील, असेही ते म्हणाले.
 ना.डॉ.गावित पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मागच्या नियतव्ययाचा पाठपुरावा केला जातो. त्यामुळे आदिवासी उपयोजना क्षेत्रात २७७ कोटी, सर्वसाधारण क्षेत्रासाठी ९९ कोटी, अनुसूचित जमाती सामाजिक न्याय विभागाचे १२ कोटी असे नियतव्यय मंजूर करण्यात आले आहे. परंतू नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा असल्याने त्यात २५ टक्के वाढ करण्याची तरतूद आहे. त्यामुळे वरील निधीमध्ये २५ टक्के वाढ करावी, अशी मागणी आपण राज्यशासनाकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खा. डॉ. हीना गावित, आ. राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे तिघांवर तलवारीने वार सात जणांविरूध्द गुन्हा दाखल, घराचेही केले नुकसान

Next Post

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ‘एसटी’च्या मोफत प्रवासाचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add