नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 21 नोव्हेंबर,2022 रोजी सकाळी 11 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे.
या बैठकीत 29 जून 2022 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे व त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजनेच्या 2023-2024 च्या सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, व अनुसूचित जाती उपयोजना, ओटीएसपी योजनेच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे. तसेच माहे 18 नोव्हेंबर 2022 अखेर जिल्हा वार्षिंक योजना 2022-2023 अंतर्गत विविध योजनेचा खर्चाचा आढावा आदी विषयांवर चर्चा होईल.
तरी सर्व कार्यान्वयीन यंत्रणा आणि सांविधानिक जिल्हा नियोजन समिती वरील सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव मनीषा खत्री यांनी कळविले आहे.








