नंदुरबार l
शहरातील मच्छिबाजार बाजार परिसरात आपसात हाणामारी करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील मच्छिबाजार परिसरात रिजवान युनूस पठाण, अन्वर फतुल पठाण, अब्दुल रहिम अब्दुल करीम खाटीक व वसीम करीम खाटीक हे चौघे जण आपसात भांडण करुन हाणामारी करतांना आढळून आले.
याबाबत पोशि.युवराज राठोड यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.








