तालुक्यातील कळंबा फाटा व कलमाडी येथे विनापरवाना ज्वालाग्रही पदार्थ विक्री करतांना आढळून आल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील कळंबा फाट्याजवळ एका टपरीच्या आडोश्याला वनकर आन्या कोकणी हा विनापरवाना ज्वालाग्रही पदार्थ विक्री करतांना आढळून आला. तसेच नंदुरबार तालुक्यातील कलमाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ज्वालाग्रही पदार्थ विक्री करतांना आढळून आला.
याबाबत पोशि.समाधान बोरसे व पोशि.सचिन सैंदाणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम २८५ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व पोहेकॉ.अनिल सोनवणे करीत आहेत.








