नंदूरबार l प्रतिनिधी
हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकुवा येथील शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हा संघटक माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलसिंग वळवी, तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रविंद्र गुरव, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, सरपंच विनोद वळवी, दिपक मराठे, कुलदीप आदी उपस्थित होते.








