Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासावर भर

team by team
November 17, 2022
in राज्य
0
राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासावर भर

मुंबई  l

 

रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ला विकासासाठी पर्यटन विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर राज्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  रायगड  विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांना  दिली.

 

 

राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री.लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे  आयोजन करण्यात आले. यावेळी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती, पर्यटन सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी,सहसंचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.

 

 

मंत्री श्री.लोढा म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याला सन २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा इतिहास रूपी माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील  तसेच  याठिकाणी लेझर शोचे देखील आयोजन करण्यात येईल. प्रतापगडाबरोबरच राज्यातील इतर गड किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ला हा पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ला परिसरात सुरू असलेल्या विकासकामांबाबत पर्यटन विभाग मदत करेल. राज्यातील सागरतटीय क्षेत्रातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी शासन आग्रही आहे. याबाबतीत आलेल्या सूचनांबर नक्कीच काम करू, असेही त्यांनी सांगितले .

 

 

रायगड विकास प्राधिकरणामार्फत सुरू कामांसाठी पर्यटन विभागाचे सहकार्य आवश्यक : संभाजी राजे छत्रपती

रायगड  विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती म्हणाले, नवीन शासन छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे ही अत्यंत चांगली बाब आहे. रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ला व परिसरात विविध विकासकामे चालू आहेत. त्यातील अनेक कामांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीची अपेक्षा आहे. किल्ले रायगडवरील  दोन निवासी खोल्यांच्या  दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून सहयोग करारानुसार हस्तांतर  लवकर करावे. तसेच जे बांधकाम पूर्ण झाले आहे, ते देखील प्राधिकरणास प्राप्त झाले तर  तेथे पर्यटक कक्ष, माहिती कक्ष , संग्रहालय , माहिती कक्ष उभारण्यास मदत होईल.

 

 

 

संभाजी राजे छत्रपती म्हणाले,  रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी खाली पाचाड येथे 88 एकर जागा रायगड प्राधिकरणाने संपादित केली आहे जेथे शिवसृष्टी, मराठा संशोधन केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, अत्याधुनिक संग्रहालय यांची उभारणी होणार आहे. एमटीडीसीमार्फत येथे सामंजस्य कराराद्वारे पर्यटक निवास व सुविधा केंद्राची उभारणी व्हावी. महाड रायगड हा राष्ट्रीय महामार्ग हेरिटेज हायवे करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात हेरिटेज हायवेचा प्रस्ताव सुद्धा प्राधिकरणास प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये जलवाहतूक, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट इ. गोष्टी अंतर्भूत आहेत. एमटीडीसी, रायगड प्राधिकरण, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय  यांचे कराराद्वारे येथे पीपीपी मॉडेल अंतर्भूत करून प्रकल्प पूर्ण करण्यात येऊ शकतो का तसेच याबाबत कार्यवाही करता येईल का ते पाहावे अशा सूचना संभाजी राजे छत्रपती यांनी केल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार

Next Post

शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी, प्रति हेक्टर ७५ हजार रू.दराने भाडेतत्वावर जमीन घेणार

Next Post
शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी, प्रति हेक्टर ७५ हजार रू.दराने भाडेतत्वावर जमीन घेणार

शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी, प्रति हेक्टर ७५ हजार रू.दराने भाडेतत्वावर जमीन घेणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add