नंदुरबार l प्रतिनिधी
अनुसूचित जाती,भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेले व व्यवसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यात आलेले विद्यार्थ्यांनी त्यांची जात पडताळणीची प्रकरणे आपल्या महाविद्यालयातून ऑनलाईन फॉर्म भरुन नोडल अधिकाऱ्यामार्फत 29 नोव्हेंबर, 2022 पर्यत सादर करण्याचे आवाहन प्राची वाजे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांनी केले आहे.
जात पडताळणीचे ऑनलाईन अर्ज भरतांना अर्जामध्ये स्वत:चा किंवा पालकांचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकरणे वैधता प्रमाणपत्र व अर्जांत त्रृटी बाबत समितीकडून ईमेलवर संदेश पाठविण्यात येईल. ऑनलाईन फॉर्म भरतांना मुळ कागदपत्रे अपलोड करावी.
प्रकरण ऑनलाईन सादर झाल्यानंतर हार्डकॉफी व कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सहीने साक्षांकित करुन 30 दिवसांच्या आत जात पडताळणी समिती कार्यालयास सादर करावी. विद्यार्थ्यांची जात पडताळणीचे ऑनलाईन अर्ज प्रकरणे विहीत वेळेत न भरल्यास महाविद्यालयांना जबाबदार धरण्यात येईल. असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.








