Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ

team by team
November 14, 2022
in राजकीय
0
नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ

नंदुरबार l प्रतिनिधी

 

येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र प्रशासकीय इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून तणाव निर्माण झाला होता.भाजपा नगरसेवकांनी नंदूरबार हे बाल शहिदांच्या शहर असून हा चुकीचा पायंडा पडेल असे म्हणत या विषयाला विरोध केला.यावेळी चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. अखेर हा विषय मंजुर करण्यात आला.

नंदुरबार नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली .यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होते.

 

कार्यालयीन अधीक्षक संजय माळी यांनी इतिवृत्त वाचले.यावेळी पालिकेच्या सभेत १५ विषय ठेवण्यात आले होते.यात नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा जनता अपघात विमा काढणे व त्या कामी खर्चास मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत सुरू असलेले निवारा केंद्र देखभाल व खर्चास मंजुरी देण्यात आली स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत शहरास मानांकन मिळणे बाबत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अहवालास मंजुरी देण्यात येणार आहे.सन २०२२ आणि २०२३ या वित्तीय वर्षाचा माहे एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ अखेर जमा आणि खर्चाचा हिशोब मंजूर करणे बाबत नगरपरिषदेच्या विविध विभागांसाठी कुशल-अकुशल प्रशासकीय कर्मचारी बाह्य संस्थेप्रशासकीय कर्मचारी बाह्य संस्थेमार्फत पुरवणी बाबत चर्चा करण्यात आली.

 

 

नंदुरबार शहराच्या मंजूर विकास योजनेतील सर्वे नंबर ४१ वरील गल्लीत चे वस्ती सुधार व शेती विभाग वगळून रहिवास भागात मंजुरी देण्यात आली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मुदतवाढ देण्याबाबत कार्यवाही मंजुरी देण्यात आली.केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेच्या पॅनलवर खाजगी वास्तू विशारद आणि अभियंता यांची नियुक्ती करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला .तसेच नगरपालिकेच्या कचरा डेपो कडे जाणार्‍या वहिवाट रस्त्यांच्या कामासमंजुरी देण्यात आली.

 

 

 

दरम्यान नंदूरबार येथील नगरपालिकेची भव्य इमारत साकारण्यात आली.त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या समारंभाला जे मंत्री आले नाहीत त्यांची नावे कोनशिलेवरून वगळण्याची मागणी नंदूरबार पालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली होती.आज झालेल्या पालिकेच्या सभेत हा विषय मांडण्यात आला.यावेळी भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांच्या सह नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी याला विरोध करीत .नंदूरबार हे बाल शहिदांच्या शहर असून हा चुकीचा पायंडा पडेल असे म्हणत या विषयाला विरोध केला.

 

यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली अखेर पालिकेच्या कोनशिलेवरून समारंभाला गैरहजर असलेल्या मंत्र्यांची नावे काढण्याचा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला.यावेळी विविध विषयांवर विरोधकांनी गदारोळ केला मात्र सर्वानुमते एक विषय वगळता सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

पालिकेने स्पष्ट करावे मी अडीच कोटींचा दावा ठोकतो

नंदूरबार येथील पालिकेत आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भाजपाचे विरोधी पक्षनेते चारुदत्त कळवणकर यांनी नंदूरबार नळवे रस्त्यावरील रेल्वेचा अंडर बायपास बोगद्याचा प्रश्न उपस्थित करीत.रेल्वे विभागाची काय चूक होती. व त्यांनी काय दुर्लक्ष केले. याबाबत टेक्निकल बाबी स्पष्ट करावे असे आवाहन करीत तुम्ही स्पष्टीकरण द्यावे मी अडीच कोटींचा दावा ठोकतो असे सांगितले मात्र यावेळी सत्ताधारी यांनी गदारोळ करीत सभा आटोपली.

बातमी शेअर करा
Previous Post

साखरपुडा करून घरी जाताना दोन वाहनांची समोरासमोर धडक,15 जण जखमी

Next Post

अरे बापरे : चक्क पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सर्विस पिस्टलसह दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post
अरे बापरे : चक्क पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सर्विस पिस्टलसह दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

अरे बापरे : चक्क पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी चोरट्यांचा डल्ला, सर्विस पिस्टलसह दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add