नंदुरबार l
शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन बेकायदेशीर पाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य महेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत सहा.उपायुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे/नंदुरबार यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शुद्ध पाण्याच्या थंड पाणी देवून नागरीकांच्या आरोग्याशी जीवेघेणा खेळ सुरु आहे. जिल्ह्यात आरओ वॉटर सप्लायर्सच्या नावाखाली अनेक ठिकाणी थंड केलेले क्षारयुक्त अशुद्ध पाणी प्लास्टीकचे ड्रममध्ये जार भरुन शहरवासियांना तसेच व्यापारी बांधव, जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आदी ठिकाणी विक्री होत आहे.
पाण्याची शुद्धता व पात्रता याची नियमित तपासणी होवून पाण्याचा नमुना घेवून योग्य अधिकार्यांमार्फत एनओसी घेणे क्रमप्राप्त असताना थंड पाण्याची कुठलीही तपासणी होताना दिसत नाही. नोंदणीकृत प्लांटची पाण्याची तपासणी करण्यात यावी. तसेच अयोग्य पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेंद्रभाई मंगा चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली होती.








