नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील लहान शहादा येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा येथील सुपड्या रतिलाल भील यांनी दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही.
या कारणावरुन सुपड्या भील यांना शत्रृघ्न भरतत भील याने काठीने तोंडावर, हातावर मारुन दुखापत केली. तसेच देवा सुक्राय भील, अंबालाल ताराचंद भील, वसंत भाईदास भील यांनीही हाताबुक्यांनी मारहाण करुन दुखापत केली. याबाबत सुपड्या भील यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोेहेकॉ.कैलास चौरे करीत आहेत.








