नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील पिंपळनेर रस्त्यावर जामतलाव येथे थे्रसर मशिनला वाहनाने धडक दिल्याने वाहनातील दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बोरविहिर येथील दिनेश शंकर गावित हा त्याच्या ताब्यातील वाहनात (क्र.जी.जे.०५ जेके १३१२) सुरेश परेश गावित यांना बसवून पिंपळनेरहून नवापूरकडे जात होता. यावेळी जामतलाव येथील वावडीफळी येथील सुऱ्या नाईक यांच्या घरासमोर रस्त्याच्या बाजूला असलेल्या ट्रॅक्टरला जोडलेल्या थे्रसर मनिशला वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात दिनेश गावित व सुरेश गावित यांना दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले आहे. याबाबत सुनिल कांतीलाल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात दिनेश गावित याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.








