Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा दोंडाईचा रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन

team by team
November 4, 2022
in राजकीय
0
शहादा दोंडाईचा रस्त्यावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचे आंदोलन
शहादा l प्रतिनिधी
शहादा ते सारंगखेडा तसेच शहादा ते शिरपूर या दोन्ही रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी यासाठी आज शहादा तालुकावासियांनी शहादा दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळाल्याने तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर करण्यात आले.
 शहादा ते सारंगखेडा तसेच शहादा ते शिरपूर या दोन्ही रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना वाहनचालकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतात ऊस उभा राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी शहादा दोंडाईचा रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर रस्ता रोको आंदोलन केले.  रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे दोन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. यावेळी आंदोलन कर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता.
  दरम्यान आंदोलक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना पोलीस निरीक्षक दीपक बुधवत यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलकांना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर काही तणाव निर्माण झाला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण साळुंखे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत सर्वानुमते आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसात परिस्थितीत बदल झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वरिष्ठ अधिकारी या दोन्ही रस्त्यांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतील असे लेखी पत्र दिल्यानंतर सर्वानुमते आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
   राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी शहादा ते सारंखेडा तसेच शहादा ते शिरपूर या दोन्ही महामार्गांची पाहणी करणार आहे तसेच ते आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतील त्याचप्रमाणे शहादा सारंगखेडा रस्त्याची दुरुस्तीचे काम विभागामार्फत सुरू करण्यात आले असून येत्या ४५ दिवसात ते पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, सारंगखेडा चे निरीक्षक राजेश शिरसाट यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा तहसिलदार यांना निवेदन

Next Post

बँक खात्यातून तीन लाख रूपये उडवले; पोलिसांनी पैसे मिळून दिले, ऑनलाइन फसवणुकीपासून असे रहा सावध

Next Post
बँक खात्यातून तीन लाख रूपये उडवले; पोलिसांनी पैसे मिळून दिले, ऑनलाइन फसवणुकीपासून असे रहा सावध

बँक खात्यातून तीन लाख रूपये उडवले; पोलिसांनी पैसे मिळून दिले, ऑनलाइन फसवणुकीपासून असे रहा सावध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add