Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

team by team
October 31, 2022
in राष्ट्रीय
0
राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

ठाणे  l

 

राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी  येथे केले.

 

 

फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष जीयानी इंफॅन्टिनो, भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे, महासचिव शाजी प्रभाकरन,  फिफा फुटबॉल फॉर स्कूलच्या फातिमाता सीडबी, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे,

 

 

 

नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. भारतीय फुटबॉल फेडरेशन, केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहयोगाने नवी मुंबईतील नेरुळमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फुटबॉल फॉर स्कूल या उपक्रमासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय व फिफा संघटनेमध्ये सामंजस्य करार यावेळी झाला. स्थानिक महापालिका शाळेतील विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

श्री. केसरकर म्हणाले की, फुटबॉल खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मदत होते. शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढ होण्यासही मदत होते. राज्यातील शाळांमध्ये २५ लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपर्यंत फुटबॉल पोचविण्यात येईल.

२५ लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल चे प्रशिक्षण देणार – धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले की, खेळाचा समावेश मुख्य अभ्यासक्रमात व्हायला हवा यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. देशातील २५ लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

देशातील प्रत्येक गावागावात फुटबॉल खेळ पोहचविण्यात येणार आहे. यासाठी नवोदय विद्यालय संघटनेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

फुटबॉल फॉर स्कूल उपक्रम

शाळांसाठी फुटबॉल (फुटबॉल फॉर स्कूल) हा फिफा द्वारे युनेस्कोच्या सहकार्याने चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ज्याचे उद्दिष्ट सुमारे ७०० दशलक्ष मुलांच्या शिक्षण, विकास आणि सक्षमीकरणासाठी योगदान देणे आहे. फुटबॉल हा खेळ अधिकाधिक मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फुटबॉल क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी फुटबॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अंकुर वाड़.मय राज्य पुरस्काराने ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाचा गौरव

Next Post

नंदुरबारात दोन गटात शिवीगाळ परस्पर फिर्यादीतून २५ जणांविरोधात गुन्हा

Next Post
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबारात दोन गटात शिवीगाळ परस्पर फिर्यादीतून २५ जणांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add