Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तलाठी मुलाकडून वृद्ध आईची फसवणूक, कोट्यवधी रुपयांत शेती केली परस्पर विक्री

team by team
October 31, 2022
in क्राईम
0
१४ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शहादा । प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील ८३ वर्षीय वृद्ध महिलेची सुलतानपूर शिवारातील शेती तलाठी असलेल्या लहान मुलाने आईला बँकेचे कर्ज व शेती तारण ठेवण्याचे सांगून परस्पर कोट्यवधी रुपयांना विक्री करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत वृद्ध महिलेने जिल्हाधिकारी मनीषा खत्री, प्रांताधिकारी तसेच शहादा तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले की , शांताबाई छगन मराठे यांच्या शहादा खेतिया रस्त्यावरील सुलतानपुर शिवारातील गट क्र. 158 / 2 / ब / 2. क्षेत्र हे 02-36 आर असून या शेतजमिनीवर 3 एकरांत केळी पिकाचे लागवड केली असुन उर्वरित भागात हरभरे हे पिक पेरले होते. सदर शेतजमिन खेडत असतांना माझा लहान मुलगा यशवत छगन मराठे हा  शिरुड दिगर येथे तलाठी म्हणुन कार्यरत आहे. तसेच त्याचे सासरे माजी मंडळाधिकारी होते व त्याचा शालक प्रविण भाऊराव जगताप यांच्या मदतीने माझी दिशाभुल करून शहादा येथे घेवुन आले व मला त्याने तयार केलेल्या दस्तावर सही करावयास लावली व मला सांगितले की, सदर शेतजमिनीवर कर्ज काढावयाचे आहे आणि बँकेला तारण करून देत आहोत” असे सांगुन माझी फसवणुक करून नमुद शेतजमिनीचे जनरल मुखत्यार लिहुन व नोंदवुन घेतले व त्याआधारे वर नमुद शेतजमिन ही बाजारमुल्याप्रमाणे रक्कम रक्कम  2 कोटी 64 लाख  रुपयांना विक्री केली आहे. सर्व पैसे माझा मुलगा यशवंत याने लोभापायी घेतले आहे.
मी अशिक्षित व वयोवृध्द स्त्री असुन मला माझे भविष्याचे उदरनिर्वाहासाठी माझ्या पतीकडुन स्त्रीधन म्हणुन मिळालेली शेतजमीन माझा मुलगा यशवंत याने माझी फसवणुक करून परस्पर विकून दिली आहे. माझा भविष्याचा आधार देखील काढुन घेतला आणि  माझ्या इतर मुलांना देखील त्याने त्या विक्री केलेल्या मिळकतीपासुन बेदखल केले आहे. माझा लहान मुलगा  यशवंत छगन मराठे व त्याचा शालक हे सरकारी कर्मचारी असल्यावर देखील स्वतःचे आईची फसवणुक केली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करणाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी,
  माझा मुलगा  यशवंत छगन मराठे तसेच त्याचा शालक सब रजिस्टार प्रविण भाऊराव जगताप हे महसुल विभागात नोकरीला असुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून माझी फसवणुक केली आहे. सदर माझा मुलगा व त्याचा शालकाने नव्या कार्यालयाच्या अखत्यारित असल्यामुळे त्यांची योग्य ती चौकशी करून मला न्याय देण्यात यावा , अशी मागणी शांताबाई मराठे (कटारे) यांनी निवेदनातून केली आहे सदर निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, शहादा पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आयोजीत शिबीरात १२० दात्यांचे रक्तदान

Next Post

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात बँडच्या तालावर हजारो कार्यकर्ते याहामोगी मातेच्या चरणी नतमस्तक

Next Post
आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात बँडच्या तालावर हजारो कार्यकर्ते याहामोगी मातेच्या चरणी नतमस्तक

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात बँडच्या तालावर हजारो कार्यकर्ते याहामोगी मातेच्या चरणी नतमस्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add